तू कशी ?
तू कधी अशी ...तू कधी तशी
शब्द ना पुरे ...तुला काय सांगू
तू कशी...तू कशी....
सळसळत्या वार्यापरी छमछमती पैन्जणे
उड-उडत्या पाखराला तूच दिले पंख ते
रिमझिमत्या पावसाला फक्त तुझी आस ग
थेंब थेंब आसुसले तुला बीलगण्या सये
तू चंद्राची शितलता ... सुर्याचा तेज तू
तू आसवांची गहीवरता ... हर्ष निखळ हास्य तू
नित्य दूर डोंगरावरूनी मेघ तुला हुडकतो
जलधारा बरसाया तुझ्यापाठी धावतो
भरदिवसा उगवला चंद्र माझ्यासामोरी
पाहून तुला नकळत पेंग सूर्याला आली
तू चंचल मन पवन ... कधी निरामयशी ज्योत तू
तू नागमोडी घाट .... कधी सरळसोट वाट तू
अजूनही किनारा तुझ्या पावलांना शोधतो
अजूनही नभ जळाला त्या क्षितिजावर भेटतो
अजूनही भ्रमापारी तू मला भेटतेस
अजूनही वेड्यापरी मी तुला कवटाळतो
तू कालची ग साथ ... अन् उद्याची आठव तू
स्वप्नात येऊन पुन्हा ... क्षण सारे पाठव तू
तू कधी अशी ...तू कधी तशी
न जाणे वार्यापरी .. गेलीस तू कुठे कशी
शब्द ना पुरे ...तुला काय सांगू
तू कशी...तू कशी....