Monday, December 14, 2020

ज़िन्दगी बंजारन

 ए ज़िन्दगी बंजारन 

चली कौन गाँव आज तू 

पाँवके छालेभी छिल गए 

अब भी रास्ते नाराज़ क्यूँ ?


नैनोसे गुजरा था कोई 

पुराने गाँव का बादल था 

पलके मूँद पी लिया है 

गिली यादोंका घूँट यूँ 


टहलते सपनोंके पाखी 

उड़ती नजरोंसे मिले थे 

क्या पता कब हो मुकम्मल 

जो चल रही है जुस्तजू 


फिरसे वह आवाज़ तेरी

रूह से टकराने दे   

ग़ज़लसी सांसोपे चढ़ा दे 

मन का सूफी साज़ तू  

Saturday, January 25, 2020

सुन्न


अविरत अबोध एकटक एकाकी
त्या निळ्याशार नभाकडे पाहता पाहता
नजर त्या कपाशीपरी मेघावर अडखळली

त्या शुभ्रशा मेघाला करडी झालर असते
अवाढव्य अथांग नभ त्याला जणू सीमा दाखवून देतो
क्षुल्लक प्रवासाच्या ठेंगणेपणाची

संयम, बंधनाचे धागे उसवताच
पूर्ण मेघच काळवंडून जातो
मग गडगडानंतरही मिळतो
तो फक्त चपलेचा चपराख
आणि गळून  जातो आवेश
ढगाचे फक्त पाणी पाणी होते

नकळत रेंगाळणारा अश्रू
मग हलकेच गालावर विरून गेला

Sunday, January 12, 2020

रे मना जा पिंजऱ्यात ...

रे मना जा पिंजऱ्यात
कोरड्याश्या हुंदक्यात
वाटे असेल जरी पहाट
अदृश्य हो तू त्या धुक्यात

रे मना जा पिंजऱ्यात ...

गर्द भासेल अशी हि गर्दी
ना दर्द जाणेल कोणी दर्दी
'वाह' देतील तुझ्या यमकास
'आह' गमाकाचा राही अज्ञात

रे मना जा पिंजऱ्यात ...

कर्कश तुझ्या हाकेस आवाज नाही
मौन ऐकण्याचा येथे रिवाज नाही
आखून घे तुझे अवकाश
खेळ तुझ्या तुझ्या अंगणात

रे मना जा पिंजऱ्यात ...

प्रकाशाहून वेगवान तू
अणूरेणूहून सूक्ष्ममान तू
अथांग अनंत समुद्र तू
तोल परिणामांच्या परिमाणात

रे मना जा पिंजऱ्यात ...

Wednesday, January 1, 2020

उद्विघ्न

काखेत लपवून अस्त
सूर्य लागला जळू
श्वासांनी ग्रस्त देह
विव्हळे अभिमन्यूचा टाळू

जिव्हाळाच्या पुराव्याचे
पूर माझ्याचवरी उलटले
आर्त हाक कर्कश झाली
बांध अंतरीचे फुटले

अंधार कुट्ट एकांती
मी मला लख्ख दिसतो
प्रकाशाचे थोतांड मांडून
तो मला गुडुप्प लपवतो

नदीत उन्हाच्या बुडुनी
जाळली नजर कोवळी
राखेत हरवली माझ्या
ती सावळीशी सावली

Tuesday, July 24, 2018

विठ्ठल


चाला विठ्ठल विठ्ठल
बोला विठ्ठल  विठ्ठल
या वार्‍यात विठ्ठल
आहे सार्‍यात विठ्ठल

ना राव विठ्ठल
ना रंक विठ्ठल
जो मोजू ना पावे
तो अंक विठ्ठल
नाही हेतू जाणे
साथी उभा ठाके
असा सवंगडीचा
तो संग विठ्ठल

बाप विठ्ठल
माऊली विठ्ठल
जग उन्ह तिथे
सावली विठ्ठल
मन निरामय
वाणी मधुर
अशा वारकर्‍या
पाऊली विठ्ठल

विठठलाचिये वारी
एक सीख घ्यावी हो जन
पहा माणसे जोडुन
देव होतो रे निर्माण
बना विठ्ठल विठ्ठल
बघा विठ्ठल विठ्ठल
या वार्‍यात विठ्ठल
आहे सार्‍यात विठ्ठल

Saturday, March 3, 2018

रिता

थोडा रुसवा फसलेला
थोडा फसवा रुसलेला मी
चाललो चांदण्या चाहुलीमागे

थोड्या अढी सोडवून
थोड्या सुटका अडवून मी
पोचलो प्रारब्धाच्या पाचोळ्यामध्ये

थोडा विरह साहून
थोडा सहवास विरुन मी
राहिलो रिता रंग इंद्रधनुष्यामध्ये

- हर्षल 

Sunday, October 8, 2017

दिन ये ढलताही नहीं....

दिन ये ढलताही नहीं
दिल सवरताही नहीं

बेमानी है जाम सारे
होश उतरताही नहीं

कबसे चुभ रहा आँखोंमे
पल गुजरताही नहीं

आईना ये अक्सको बोले
तुझे पहचानाही नहीं

छेडो ना अब उसकी नज्मे
दिल क्यूँ समझताही नहीं