Wednesday, November 24, 2010

विरह

शब्द बोलले गीतातून .. पण भाव तिला कळलेच नाहीत
असावरी ती, मी यमन... सूर आमुचे भेटलेच नाहीत

मी माझ्याशी सौदा केला ..श्वासांचा आणि आठवांचा
तिच्या आठवांना द्याया माझे .. श्वासदेखील पुरलेच नाहीत

मी गेलो दूर तरीहीती... अजुन माझ्या शब्दांत हसते
किती मौसमे गेली तरीही .. रंग तिचे पुसलेच नाहीत

अशी आरशालाही तिची ... सवय आता लागलेली
तिचीच छबी दाखवे तोही ... चेहरे अन्य दिसलेच नाहीत

Thursday, October 21, 2010

आता माझ्याकडे बोलण्यासारख काहीच नाही आहे...

आता माझ्याकडे बोलण्यासारख काहीच नाही आहे

मन रिकामे नाही ...पण विचार पोकळ झाले आहेत
कधी जरतारी, नक्षिदारसे असणारे भाव
आता कुठल्यातरी काट्यात रुतुन उसवू लागलेत
मी आता त्यावर फक्त कृत्रिम ठिगळ लावतोय
खोटाच हसतोय, खोटाच रडतोय.. खरतर खोटाच जगतोय

लकाकी हरवलेले अलंकार घेऊन फिरणार्‍या माझ्या पेटीत
आता दाखवण्यासारख काहीच नाही आहे
आता माझ्याकडे बोलण्यासारख काहीच नाही आहे

माझ्या लुटुपूटु चालणार्‍या मनानी काळाशी शर्यत लावली आहे
त्याला पकडता पकडता ते माझ्यापासून खूप दूर गेल आहे
त्याने कुठलातरी दुसराच "मी" शोधलाय
माझ्यासारखाच .... पण माझ्याहून खूप वेगळा "मी"
त्या भरकटलेल्या मनाला मला आरसा दाखवायचा आहे

धावून धावून थकलेल्या, सुकलेल्या त्या फुलाकडे
आता दरवळण्यासारख काहीच नाही आहे
आता माझ्याकडे बोलण्यासारख काहीच नाही आहे


Wednesday, September 29, 2010

कविता



कधी कधी मनही माझ्याशी बोलेनास होत
त्यालाही एकट रहावास वाटत
रुसलय का चिडलय कळतच नाही
कदाचित त्यालाही मित्रान्शिवाय करमत नसत
===================================

तेरी झुल्फोंकी लटे आँखोंपर जो बिखरी
तो ऐसा लगा जैसे रात हो गयी

और दिलसे आवाज़ निकली....आज सितारें ज़्यादा क्यूँ है ??

======================================

कई मोड़ लेके रास्ते फिरसे मिल रहे थे
कई शब गुज़ारे थे चौराहेपे राह देखके

बस मिले तो पहचान नही पाए एक-दूसरेको

=====================================


झिलमिलातेसे कुछ ख्वाब चमक रहे थे आसमानमें
चाँद समझके बसा लिया तुझे इन आँखोंमें
तभी सोचूँ जिंदगीमें इतना अंधेरा क्यूँ है ?

========================================

जहाँ लहरें भी थक जाये बहते बहते...
और आसमाँ भी रुक जाये चलते चलते...
उफक़कि रेखापर समयभी रुक जाये...
और सूरजभी थम जाये ढलते ढलते....

ए माझी ..चल ले चल मुझे

==========================================

सावनकी सांझी बूँदें
पत्तोंसे लिपटे कहे
आदाब नमस्ते करने
बादलसे आई हूँ में

तू बाहोंमें अपनी लेके
मुझकोभी हरा बना दे
ए चाँद, सितारों, हवाओं
ज़रा अपना रुख़ मुड़ा दे

सच्चे झूठेसेभी उँचे
इश्क़ को सलाम
सलाम-ए-इश्क़

===============================

कशी पुरतील सये
सात जन्मे प्रेमासाठी
एका दिसापरी सारी
संपतील ना .....

युगे युगे माझ्यासाठीच
पुन्हा पुन्हा धरेवरी
पाठवाया साकड तू
घालशील ना ....

================================


Tuesday, September 28, 2010

कधी कधी अस होत .....



कधी कधी अस होत
काही सुचेनास होत
भरून येत आभाळ
तरी ते बरसेनास होत

पिसारा फुलवलेल्या मोरालाही
मग नाचवेनास होत
केसरलेल्या सूर्यालाही
मावळेनास होत

तिन्ही सान्जेआधिच
चन्द्राला राहवेनास होत
उगवण्यावाचुन एक क्षणही
थांबवेनास होत

बेचैन वार्‍यालाही लागते थंडी
त्याला एका जागी बसवेनास होत
अंधुक नजरेच्या धुक्यालाही
हाती गंध घेऊन कोणालातरी शोधावस होत

रंगालाही मग रंगावस होत
कोणासाठीतरी सजावस होत
इंद्रधनुच्या सात छटा
सोडून नभी उडावस होत

सगळ असत तिथेच
पण काहीतरी सापडेनास होत
न हरवलेल तेच काहीतरी
मग शोधवस होत

सगळा असतो मनाचा खेळ
सतावल तरी खेळावासा वाटतो
आणि बेचैन उत्सुक श्वासांचा आवन्ढा
समयालाहि गिळावासा वाटतो

कुणाला अस्स होत
कुणाला तस्स होत
तू येणार म्हणल्यावर
सगळ्यांनाच कस्स कस्स होत.....

Tuesday, September 14, 2010

विरहाचे शब्द

कुठे गेले ते शब्द ?
जे फक्त तुझ्यासाठी जपून ठेवले होते...
पत्रापासून लांबवलेले आणि लेखणीच्या शाईतच गोठवलेले ......
आपल्या आठवणींची किंमत होते ते...
येणार्‍या विरहास माझी संगत होते ते....

आठवतय....
लांबूनच मी तुझी चाहूल ओळखायचो...
पैन्जण नसलेले पाऊल ओळखायचो...
तुझी गुलाबी गालातली मोहक खळी...
गजर्‍यातून हातावर ओघळलेली ती कळी...
मी काहीच विसरलो नाही....
पण तू विसरलीस बहुतेक ...जाऊ दे...

माझ्याकडून शेवटची भेट आहेत हे ...
किमान ते तरी विसरणार नाहीस अशी अपेक्षा आहे......
जीभेच्या कोन्यात अडकले होते हे..
ओठातून निघण्यास घाबरले होते हे....

पण शेवटी आले.. नाही म्हणत म्हणत....
शेवटचे सांगतो... जा... गेलीस उडत........

Sunday, September 12, 2010

गणराया !!

हे शिवसूता! उद्धारी जगा या
मंगल नमन करीतो तुज गणराया ||

बुद्धीच्या देवा ! दे बुद्धी सन्मार्गाची आम्हा
मार्ग द्वय नेहमीच ठेव तसाच रिता
पावलातळी पडो नित्य सत्याचाच ठसा
स्मरण तुझे देवा हे कर्म न विसराया ||

श्रमास फळ दे, श्रमकर्‍यास बळ दे
खल दूर करूनी, नितळसे मन दे
दे मानवास मानवता अन् शांततेस आसरा
मागतो तव चरणी, दे न्याय न्याया ||

Saturday, September 4, 2010

चाँदकी कहानी

रातकी सतह्पर चाँद अपना रास्ता बना रहा था
बादलोँकि धूल उछालें, सितारोन्कों निहारे, बस बढ़ाताही जा रहा था
रातके अंधेरेमेंभी उसको किनारा साफ़ साफ़ नज़र आ रहा था
उसी किनारेसे सुबहकी नदी बहती थी
किनारेपे तो वो ठंडी, सुनहरी थी
पर बिच-मजधार वो उग्र हो जाती थी
बिना सोचे समझे चाँदने उसमें डुबकी लगाई
देखतेही देखते वो नदीमें जैसे घुलसा गया
अब चाँदको ढुंडना मुश्किल हो गया था
सूरजकी किरनोंसे खुदको ढके वो नदी पार कर रहा था
तैरते तैरते वो वो किनारे पहुँच गया
किनारेपे एक और रात उसका इंतज़ार कर रही थी
और उसके किनारे शायद और एक सुबह

जिंदगीभीतो चाँदसी सफ़र करती है
कभी अंधेरें तो कभी उजालोंमें रहगुजर करती है
काश उसकोभी चाँदकी तरह सफरका गिला ना होता

Monday, July 26, 2010

पुन्हा पुन्हा ...तेच तेच

पुन्हा पुन्हा ...तेच तेच
तिच वाट ..... तशीच ठेच

आनंदात हसताना थोडेच गाल ताणायचे
दु:खात रडतानाही मोजून अश्रू ढाळायचे
भावांचेही भाव करून
सुट्टे मात्र वाचवायचेच

मन भरून मनाला एकदा भिजायला काय हरकत आहे ?
इंद्रधनूची स्वप्ने मनी रंगवायला काय हरकत आहे ?
पण करड्या कोरड्या मनाला
सर्दि पडसे कायमचेच

जे आहे त्यात समाधान ....आणि समाधानात सुख आहे
हरलो शर्यत तरीही ठीक ....भाग घेतला हेच खूप आहे
स्वप्नांनाही उडताना मग
जवळचीच लक्ष्मण-रेष


पुन्हा पुन्हा ...तेच तेच
तिच वाट ..... तशीच ठेच



Saturday, July 17, 2010

काल पुन्हा पाउस पडला.....

काल पुन्हा पाऊस पडला.....

काल पुन्हा पाऊस पडला
आसमानाचा घोडा उधळला
आणि ढगाची धूळ
जमिनीवर उडवून गेला
बहुधा कुणीतरी त्याच्या पाठीवर
विजेचा चाबूक फिरवून गेला
काल पुन्हा पाऊस पडला...

काल पुन्हा पाऊस पडला
कोकिळेला गायला आणि
मोराला नाचायला
निसर्गाचा मंच मिळाला
कुणीतरी मातीचा गंध तेवून
मग मैफिलीचा समा बांधला
काल पुन्हा पाऊस पडला...

काल पुन्हा पाऊस पडला
मग सात रंगाच्या छटा गुंफून
कुणीतरी आभाळपटावर धनुष्य रंगवला
हिरवा रंग जास्त आणला होता बहुतेक
जाता जाता तो धरेवर शिंपडून गेला
काल पुन्हा पाऊस पडला...

काल पुन्हा पाऊस पडला
आणि आठवांचा तलाव मनात साचला
मग तिच्यासोबतचा प्रत्येक पाऊस
पुन्हा एकदा चिंब भिजवून गेला
काल पुन्हा पाऊस पडला
कुणीतरी थोडासा पाउस मलाही देऊन गेला
काल पुन्हा पाऊस पडला....

Wednesday, July 14, 2010

शेतकरी

Few months back, I saw movie named 'Gabhricha Paaus'(The Damned Rain). I loved the movie an black humour in it. the protagonist ( farmer) in the movie just prays for the rain... rest he is ready to struggle up to any level.. the poem also reflects the mindset of similar farmer who just wants rain and nothing else from the god...

रामा रे रामा.. रामा रे रामा


लई वन्गाळ वन्गाळ

दिस जातायती देवा

रातीमागून पुन्हा

काळोख येतोया भेटाया

किती दिस झाले आता

तरी सरना अमोशा



दाव आशेचा किरण

दाव आशेचा किरण

बळ दे रे या घामाला

रामा रे रामा.. रामा रे रामा


नाही मागत म्या सुख

नको सुखाचीभी भीक

त्यापरीस जागेन म्या

खाऊन पोटभर भूक

भेगाळली जमीन

नाही भेगा र इराद्याला


लई रडवलस आम्हा

लई रडवलस आम्हा

आता रडव ढगाला

रामा रे रामा.. रामा रे रामा
















Tuesday, July 6, 2010

ये लम्हे जाली है

ये लम्हे जाली है
बिल्कुल खाली खाली है

वक़्तकी धड़कन जैसे थमसी गयी है
साँसे बरफसी जैसे जमसी गयी है
पल तो कटता है
पर ना लगता है
की जिंदगी आगे चली है

सुबहसे ये रात...कट ना रही है
ज़ुबाँसे कोई बात ... छूट ना रही है
अंधेरी झरनोंसे
सुबहकी किरणोंमें
रातकी स्याही मिली है



Thursday, July 1, 2010

अव्यक्त


घे ऋतू संग .... दिगंत तू
ऊड भानुसन्गे ... विहंग तू
चराचरी या नश्वर काया
एकटाच अथांग अभंग तू

चाल तेज-वाट .. पहाट तू
बोल अमृताच्या .... सूरात तू
जलदाहाति डोर जयाची
अनंत उंच ..... पतंग तू


तू विनाशनाशी .... अविनाश तू
तू ब्रह्मा तू विष्णू... महेश तू
काळरन्गी नाहला जो
चिररंग ... अंतरंग तू



Friday, June 25, 2010

चाललो उद्यात आता .....

चाललो उद्यात आता
सोडून आज पाठी
डोळ्यात खेळतो चंद्र
पापण्यात आडवून पाणी

लोहश्रुन्खला श्वास
पावले मणा-मणाची
दवबिन्दुपरी डोळ्यात
सजतात जुन्या आठवणी

नवी पात्रे पुन्हा
पुन्हा नवा पसारा
नव्या ठिकाणी पुन्हा
सुरू माझी नवी कहाणी


क्षणभन्गुर वळण हे माझे
भेटू पुन्हा नव्या वळणी
मग गाउ पुन्हा नव्याने
ती कट्ट्यावरली गाणी

Friday, May 21, 2010

ग्रस्त


This was the first poem that I have written. It was on the life of a poor person who lost his entire family in the floods and does not want to live. It was inspired by floods that struck in my town few years back.

जीव हैराण हैराण
जीव उदास उदास
जीवामध्ये जीव परी
नाही जगण्याची आस

वाट चाले अंधारात
उगा बसलो पहात
मी काजव्याची वाट

वाट पहात पहात
पाय शिणले कोन्यात
मन हुंदके देई
कुठेशा आडोश्यात

रात सलत सलत
नाही संपत संपत
सोडली डोळ्यांनी
आता प्रभाताची आस

जीव हैराण हैराण
जीव उदास उदास

पहा तिरडी निघते
रोज ह्या जिवीताची
रोज मरतो परी
मज मरता येत नाही

देह वैरण वैरण
टाका आता ह्याला जाळुन
मयताला आणा
चार-चौघे बोलावून

मातीचा हा देह
आता मातीत जाउ दे
मातिमोल होऊन
या मातीला सोडू दे

जहारीला झाला
आता हरेक माझा श्वास

जीव हैराण हैराण
जीव उदास उदास

Monday, May 17, 2010

कधी कधी एकट असावास वाटत....

कधी कधी एकट असावास वाटत....
अगदी सर्वांपासून लांब ....
बाजूला असु देत फक्त वार्‍याच्या उडत्या भिंती
आणि झाडाचे हिरवे खांब...

आकाशाच्या छताखाली फक्त दोघेच ..
मी आणि माझ्या आठवणी...
अगदी नजर जाईल तितक्या लांब....

एकेक आठवण घेऊन
डोळ्यात काजळाप्रमाणे सजावावी ....
आणि मग हळूच त्यातील एक तिट काढून..
आसामांताचीही नजर काढावी .....
हात धरून वेळेचा तिला म्हणेन ...
एवढी कसली घाई ..अग जरा थांब ....
पळता पळता तुझ्याबरोबर ...बरच काही सांडल ....
उचलू दे क्षण ते सारे ...
आज एकांती निवांत ...अग जरा थांब ..

कधी कधी एकट असावास वाटत....
अगदी सर्वांपासून लांब ....

रसिया बोलत नाही ...

रसिया बोलत नाही
अधरपटल को खोलत नाही
रसिया बोलत नाही

मनमें गाँठ ... बनाए है कुछ
रुत पतझड़की.... सताए है कुछ
सुरसंग काहे मन डोलत नाही
रसिया बोलत नाही

गुलरंग जियासंग ... खेलत नाही
झूठमूठ राज सब... भावत नाही
तोरा संग किसीसंग तोलत नाही
रसिया बोलत नाही

रिमझिम गिर गिर.....बूँद सताए
आँखियॉंका सावन ये....ढल ना पाए
तोरा मुख छीन नैन छोड़त नाही
रसिया बोलत नाही






Tuesday, April 20, 2010

गंध

कधी कधी आकाशाच्या बागेत रमून जावस वाटत....
निळ्याशार भुईत रुजलेल्या ढगाच्या मुळातून उमलावस वाटत.....
वार्‍याच्या फांदीला लगडून थेंबांच्या पाकळ्या होऊन बरसावस वाटत....
म्हणजे मी धरतीच्या कणाकणात रूजेन..... मृद्गंध होऊन....
आणि मग माझ्या गंधाचा बगीच्यातली फुलेही हेवा करतील...
कारण त्यांच्या सुगंधाने फक्त येणारे जाणारे सुखावतील .....
पण मी सुखावीन लहान थोरांनाच नव्हे ...
तर मोर, बेडुक आणि शेतकर्‍यालाही....

Thursday, March 11, 2010

लेक्चर

डोळ्यात पाणी अन् आ वासलेला
ना आश्चर्य , ना भीती, आळस दाटलेला

मुंग्यांपरी डोळ्यात रांग जांभयांची
पाणीदार पापण्यात झोप जागलेली

एरवी कधी कोणासमोर ना वाकलेली
हतबलशी मान हातावर झुकली ही

पापण्यांना पापण्यांची ओढ अशी लागली
विसरून जग सारे त्यांनी अलगद मिठी घातली

निराळेच सौख्य मज डोळ्यात साठे
लेक्चर नव्हे, मज ही अंगाई वाटे

Friday, March 5, 2010

माझे वाळवंट...


होय .... मीच केले आहे मृगजळ या इथे उभे...
बाकी माझ्या वाळवंटी उगवणारे काहीच नव्हते
म्रुगजळात या नसेल पाणी
पण पाण्यची आस आहे
लढण्यास मला ती तेवढीच आस बास आहे...
होय .... मीच केले आहे मृगजळ या इथे उभे...

होय..मीच मला हाक मारली त्या ओसाड मरूस्थळी...
कारण त्या विराण ठिकाणी बहुदा देवही नव्हता
मग मीच मला देव केला
ठेवली श्रद्धा स्वत:वर
तीच श्रद्धा श्वास झाली ..त्या घुसमटत्या क्षणांची..
होय..मीच मला हाक मारली त्या ओसाड मरूस्थळी...

फिरसे ये जिंदगी ...... खुलके है हसीं

माथेपे शिकंज लिए
आँखे थी जागती
टाइम मिले तो
नींदोमें सपनेभी देखती

अब जाके पिंजरेसें
उड़ के ये चली
फिरसे ये जिंदगी
खुलके है हसीं

वक़्तके टीचर ने
मुर्गा बनाया इसे
वक़्तही ना रोक पाया
स्कूल की घंटी जब बजी

अब जाके पिंजरेसें
उड़ के ये चली
फिरसे ये जिंदगी
खुलके है हसीं

Tuesday, February 23, 2010

प्रेमाचे बोलणार.....



रन्काळाच्या तळ्यावर
कुठेतरी काठावर
छोट्याश्या बाकावर
हात तुझा हातावर
घेउनिया तोलणार
प्रेमाचे बोलणार

कुत्र्याचे भुन्कणे
भेळवाल्याचे ओरडणे
तुझे ते टोमणे
येणारे जाणारे चोम्बडे
अशा या एकांतात
प्रेमाच्या या फंदात
मनातले सान्गणार
प्रेमाचे बोलणार......

काळे काळे डोळे
तुझे आगीचे गोळे
गाल गोरे गोरे
जरा हसू देत थोडे
लाल लाल ओठ
करती शब्दांचे स्फोट
माझी हाताची घडी
आणि तोन्डावर बोट
संपले सारे तुझे
की माझी पळी येणार
प्रेमाचे बोलणार.......


विझु लागता संध्याकाळ
बघू लागशील तू घड्याळ
चल निघते ... उशीर झाला
म्हणुन घेशील काढता पाय
पुन्हा गेला वाया वेळ
नाही जमला शब्दांचा खेळ
पुन्हा ओठ गप्प ... डोळ्यात घालमेळ

नाही जमल आज
आता उद्याच्या भरवश्यावर
पुन्हा भेटु उद्या
मी पुन्हा try मारणार
प्रेमाचे बोलणार.....











Monday, February 8, 2010

संध्याकाळ

चालता चालता
डोक्यावरल आभाळ
किनारी सागराच्या
जमिनीत मिसळल

उन्हा पाण्याची ती भेट
गोड क्षितीजाची रेघ
जांभई देता सूर्य
रंग तांबडा शिंपत

हाक मारुन चन्द्राला
सूर्य निजायला गेला
सार आभाळ उशाशी
अन् सागर पांघराया

तिन्ही सांजा सखे झाल्या
आता होईल अंधार
तुझ्याविणा परतेल
पुन्हा उदास संध्याकाळ

आठवणीतला पाउस

आता कुठे रिमझिमत्या पावसाला सुरूवात झाली
लगेच तुझ्या आठवांची ओठांवर बात आली

काय नशीब लेवुनी ते थेंब जन्मले होते
बरसाया धरेवर ज्यांना तुझी रेशमी वाट मिळाली

थेंब गालांच्या खळीतला अजूनही स्मरतो मजला
तू दुर्लक्षिले पण अधराची त्याने जळफळाट पाहिली

विसराया आभाळ ते सारे पाऊस कधी संपलाच नाही
पुन्हा आठवांचे मेघ दाटले , बघ पुन्हा आसवे बरसली

आई

असा उचलुनी गंध तिचा
माळावा त्या फुलात
कळू देत त्यालाही
कसा दरवळतो अंतरंग

ना मोहाची ग्लानि त्याला
ना मत्सराची उग्रता
हळव्या करुण वात्सल्येचा
गंधच तो वेगळा

हा गंध नामानिरळा
ना कधी कुणाला उमगतो
आयुष्यभराच्या समायासाठी
उरामध्ये बहरतो

डोळ्यात काळजीचे
मोती सदा बंद
घरट्यात जीव ज्याचा
हा गंध तो विहंग

आपल्याच साठी फक्त
आटवते ती रक्त आणि गाळते ती घाम
गंधास त्या घामाच्या
माझा शत शत प्रणाम

Sunday, January 3, 2010

तू कशी ?

तू कशी ?

तू कधी अशी ...तू कधी तशी
शब्द ना पुरे ...तुला काय सांगू
तू कशी...तू कशी....


सळसळत्या वार्‍यापरी छमछमती पैन्जणे
उड-उडत्या पाखराला तूच दिले पंख ते
रिमझिमत्या पावसाला फक्त तुझी आस ग
थेंब थेंब आसुसले तुला बीलगण्या सये
तू चंद्राची शितलता ... सुर्याचा तेज तू
तू आसवांची गहीवरता ... हर्ष निखळ हास्य तू

नित्य दूर डोंगरावरूनी मेघ तुला हुडकतो
जलधारा बरसाया तुझ्यापाठी धावतो
भरदिवसा उगवला चंद्र माझ्यासामोरी
पाहून तुला नकळत पेंग सूर्याला आली
तू चंचल मन पवन ... कधी निरामयशी ज्योत तू
तू नागमोडी घाट .... कधी सरळसोट वाट तू

अजूनही किनारा तुझ्या पावलांना शोधतो
अजूनही नभ जळाला त्या क्षितिजावर भेटतो
अजूनही भ्रमापारी तू मला भेटतेस
अजूनही वेड्यापरी मी तुला कवटाळतो

तू कालची ग साथ ... अन् उद्याची आठव तू
स्वप्नात येऊन पुन्हा ... क्षण सारे पाठव तू
तू कधी अशी ...तू कधी तशी
न जाणे वार्‍यापरी .. गेलीस तू कुठे कशी
शब्द ना पुरे ...तुला काय सांगू
तू कशी...तू कशी....