Saturday, November 19, 2011

ए माझी


जहाँ लहरेंभी थक जाए बहते बहते
और आसमाँ भी रुक जाए चलते चलते
उफक़कि रेखापर समयभी झुक जाये
और थम जाये सूरजभी ढलते ढलते


जहा यादें भी मन तक पहुँच ना पाएँ
और आसूभी आँखोसे ओंझल हो जाये
जिस किनारे का कोई किनारा ना हो
और खयालॉँका कोई बहाना ना हो


जहा बस एक दीवार हो हवासे भी पतली
और सन्नाटेसे भी धीमी आवाज़की गली
जहासे गुज़रु तो मैं भी देख पाउ
की उस जानिब कौन टेक लगाए बैठा है


मैं खुद से मिल जाउ जहाँ
ए माझी मुझे ले चल तू वहाँ ......

Lines inspired by Gulzar's poem

Wednesday, November 2, 2011

शोध

मी परत परत त्या देवळाच्या पायथ्याशी जातो

आणि कोरड्या नजरेने विराणे पाहतो



त्या रस्त्याला बहुतेक नजर लागली कुणाचि तरी

तू गेल्यावर तू नसल्याची अफवा पसरली

आता तिथे फारशी वर्दळ नाही

इतकी वाहने सरली त्यावरुन

की आता रस्त्यालाही सूरकुत्या पडल्या आहेत

पण मी परत परत त्या देवळाच्या पायथ्याशी जातो

आणि खडड्यांवर साचलेल्या धुळित तुझी पावले हुडकतो



खूप महिने झाले तुझे घर पडून

आता त्याच्या भिंतीच्या आठवणीही धूसर झाल्या आहेत

पण तुझी ती मूर्ती डोळ्यात अजुन साचून आहे

कमरेवर हात ठेवून हळूच गालात हसणारी

मजा यायची ना तुला ??

रांग लागायची जेव्हा तुला बघायला



अजूनही मी परत परत त्या देवळाच्या पायथ्याशी जातो

आणि ती पडकि भिंत हुडकतो

कदाचित तू दिसशील कुठल्यातरी भिंतीच्या पल्याड



आता एकटाच असतो मी तेथे

लोक म्हणतात त्यानी तुला वेशिपलिकडे पाहिलय

तिथे आता तुझे नवीन घर आहे म्हणे

छोटसच .. पण जरा महाग आहे म्हणे

तो भाग जरा शहरापासून जवळ आहे ना

पण मला अजुन खात्री आहे की तू इथेच आहेस

मी जिथे बोलावेन तिथे तू असशील



म्हणूनच मी परत परत त्या देवळाच्या पायथ्याशी जातो

आणि हाक मारतो "विठ्ठला !!.. आहेस का रे"

"देऊळ सोडून गेलास .. पण माणसाच्या आतून गेला नाहीस ना"