Monday, February 8, 2010

आई

असा उचलुनी गंध तिचा
माळावा त्या फुलात
कळू देत त्यालाही
कसा दरवळतो अंतरंग

ना मोहाची ग्लानि त्याला
ना मत्सराची उग्रता
हळव्या करुण वात्सल्येचा
गंधच तो वेगळा

हा गंध नामानिरळा
ना कधी कुणाला उमगतो
आयुष्यभराच्या समायासाठी
उरामध्ये बहरतो

डोळ्यात काळजीचे
मोती सदा बंद
घरट्यात जीव ज्याचा
हा गंध तो विहंग

आपल्याच साठी फक्त
आटवते ती रक्त आणि गाळते ती घाम
गंधास त्या घामाच्या
माझा शत शत प्रणाम

No comments:

Post a Comment