कधी कधी आकाशाच्या बागेत रमून जावस वाटत....
निळ्याशार भुईत रुजलेल्या ढगाच्या मुळातून उमलावस वाटत.....
वार्याच्या फांदीला लगडून थेंबांच्या पाकळ्या होऊन बरसावस वाटत....
म्हणजे मी धरतीच्या कणाकणात रूजेन..... मृद्गंध होऊन....
आणि मग माझ्या गंधाचा बगीच्यातली फुलेही हेवा करतील...
कारण त्यांच्या सुगंधाने फक्त येणारे जाणारे सुखावतील .....
पण मी सुखावीन लहान थोरांनाच नव्हे ...
तर मोर, बेडुक आणि शेतकर्यालाही....
No comments:
Post a Comment