This was the first poem that I have written. It was on the life of a poor person who lost his entire family in the floods and does not want to live. It was inspired by floods that struck in my town few years back.
जीव हैराण हैराण
जीव उदास उदास
जीवामध्ये जीव परी
नाही जगण्याची आस
वाट चाले अंधारात
उगा बसलो पहात
मी काजव्याची वाट
वाट पहात पहात
पाय शिणले कोन्यात
मन हुंदके देई
कुठेशा आडोश्यात
रात सलत सलत
नाही संपत संपत
सोडली डोळ्यांनी
आता प्रभाताची आस
जीव हैराण हैराण
जीव उदास उदास
पहा तिरडी निघते
रोज ह्या जिवीताची
रोज मरतो परी
मज मरता येत नाही
देह वैरण वैरण
टाका आता ह्याला जाळुन
मयताला आणा
चार-चौघे बोलावून
मातीचा हा देह
आता मातीत जाउ दे
मातिमोल होऊन
या मातीला सोडू दे
जहारीला झाला
आता हरेक माझा श्वास
जीव हैराण हैराण
जीव उदास उदास
No comments:
Post a Comment