वय कोवळे प्रेमाचे
डोळ्यांतूनी बोलण्याचे
वय कोवळे प्रेमाचे
स्पर्श होता नजरेचा
चलबिचलणार्या पापण्यांचे
वय कोवळे प्रेमाचे
वेणीत माळल्या फुलगंधाने
रंग मनाचे हेरण्याचे
वय कोवळे प्रेमाचे
लिफाफ्यातून पुस्तकांच्या
स्थळ सान्गणे भेटण्याचे
वय कोवळे प्रेमाचे
मन कोवळे, तन कोवळे
घाव कोवळे झेलण्याचे
वय कोवळे प्रेमाचे
संध्याकाळी बालपणाच्या
कळीने फुलू पाहण्याचे
वय कोवळे प्रेमाचे ......
डोळ्यांतूनी बोलण्याचे
वय कोवळे प्रेमाचे
स्पर्श होता नजरेचा
चलबिचलणार्या पापण्यांचे
वय कोवळे प्रेमाचे
वेणीत माळल्या फुलगंधाने
रंग मनाचे हेरण्याचे
वय कोवळे प्रेमाचे
लिफाफ्यातून पुस्तकांच्या
स्थळ सान्गणे भेटण्याचे
वय कोवळे प्रेमाचे
मन कोवळे, तन कोवळे
घाव कोवळे झेलण्याचे
वय कोवळे प्रेमाचे
संध्याकाळी बालपणाच्या
कळीने फुलू पाहण्याचे
वय कोवळे प्रेमाचे ......
No comments:
Post a Comment