चाला विठ्ठल विठ्ठल
बोला विठ्ठल विठ्ठल
या वार्यात विठ्ठल
आहे सार्यात विठ्ठल
ना राव विठ्ठल
ना रंक विठ्ठल
जो मोजू ना पावे
तो अंक विठ्ठल
नाही हेतू जाणे
साथी उभा ठाके
असा सवंगडीचा
तो संग विठ्ठल
बाप विठ्ठल
माऊली विठ्ठल
जग उन्ह तिथे
सावली विठ्ठल
मन निरामय
वाणी मधुर
अशा वारकर्या
पाऊली विठ्ठल
विठठलाचिये वारी
एक सीख घ्यावी हो जन
पहा माणसे जोडुन
देव होतो रे निर्माण
बना विठ्ठल विठ्ठल
बघा विठ्ठल विठ्ठल
या वार्यात विठ्ठल
आहे सार्यात विठ्ठल
No comments:
Post a Comment