काल पुन्हा पाऊस पडला.....
काल पुन्हा पाऊस पडला
आसमानाचा घोडा उधळला
आणि ढगाची धूळ
जमिनीवर उडवून गेला
बहुधा कुणीतरी त्याच्या पाठीवर
विजेचा चाबूक फिरवून गेला
काल पुन्हा पाऊस पडला...
काल पुन्हा पाऊस पडला
कोकिळेला गायला आणि
मोराला नाचायला
निसर्गाचा मंच मिळाला
कुणीतरी मातीचा गंध तेवून
मग मैफिलीचा समा बांधला
काल पुन्हा पाऊस पडला...
काल पुन्हा पाऊस पडला
मग सात रंगाच्या छटा गुंफून
कुणीतरी आभाळपटावर धनुष्य रंगवला
हिरवा रंग जास्त आणला होता बहुतेक
जाता जाता तो धरेवर शिंपडून गेला
काल पुन्हा पाऊस पडला...
काल पुन्हा पाऊस पडला
आणि आठवांचा तलाव मनात साचला
मग तिच्यासोबतचा प्रत्येक पाऊस
पुन्हा एकदा चिंब भिजवून गेला
काल पुन्हा पाऊस पडला
कुणीतरी थोडासा पाउस मलाही देऊन गेला
काल पुन्हा पाऊस पडला....
Wantas
ReplyDelete