Sunday, September 12, 2010

गणराया !!

हे शिवसूता! उद्धारी जगा या
मंगल नमन करीतो तुज गणराया ||

बुद्धीच्या देवा ! दे बुद्धी सन्मार्गाची आम्हा
मार्ग द्वय नेहमीच ठेव तसाच रिता
पावलातळी पडो नित्य सत्याचाच ठसा
स्मरण तुझे देवा हे कर्म न विसराया ||

श्रमास फळ दे, श्रमकर्‍यास बळ दे
खल दूर करूनी, नितळसे मन दे
दे मानवास मानवता अन् शांततेस आसरा
मागतो तव चरणी, दे न्याय न्याया ||

1 comment: