पुन्हा पुन्हा ...तेच तेच
तिच वाट ..... तशीच ठेच
आनंदात हसताना थोडेच गाल ताणायचे
दु:खात रडतानाही मोजून अश्रू ढाळायचे
भावांचेही भाव करून
सुट्टे मात्र वाचवायचेच
मन भरून मनाला एकदा भिजायला काय हरकत आहे ?
इंद्रधनूची स्वप्ने मनी रंगवायला काय हरकत आहे ?
पण करड्या कोरड्या मनाला
सर्दि पडसे कायमचेच
जे आहे त्यात समाधान ....आणि समाधानात सुख आहे
हरलो शर्यत तरीही ठीक ....भाग घेतला हेच खूप आहे
स्वप्नांनाही उडताना मग
जवळचीच लक्ष्मण-रेष
पुन्हा पुन्हा ...तेच तेच
तिच वाट ..... तशीच ठेच
khalas
ReplyDeletekadakkkk
ReplyDelete